GMC लिंक हॉस्पिटलची मागणी; करार नसेल तर सरकारने माझ्यावर खटला भरावा — पार्सेकर तुये हॉस्पिटलला गोवा मेडिकल कॉलेजशी लिंक हॉस्पिटल घोषित करण्याच्या मागणीसाठी तुये हॉस्पिटल अॅक्शन कमिटीने पाचव्या दिवशीही आपले आंदोलन सुरू ठेवले. या सुरू असलेल्या आंदोलनात माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर, जिल्हा पंचायत सदस्य राधिका पालयेकर तसेच इतर स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले. यावेळी पार्सेकर यांनी ठामपणे सांगितले की तुये हॉस्पिटल हे GMC शी लिंक हॉस्पिटल झालेच पाहिजे. तसेच, असा कोणताही करार अस्तित्वात नसेल, तर सरकारने माझ्यावर खटला भरावा, असे थेट आव्हान त्यांनी यावेळी सरकारला दिले.
Categories
Civic Issues
तुये हॉस्पिटल आंदोलन; माजी मुख्यमंत्री पार्सेकर सहभागी
