Categories Civic Issues

खाजणे बोगदा परिसरात रेल्वेखाली गवा ठार

दहा-बारा गव्यांचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडताना अपघात; एक गवा गंभीर जखमी होऊन मृत खाजणे बोगदा परिसरात १९ रोजी पहाटे रेल्वेची धडक बसून एका गव्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दहा-बारा गव्यांचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. रेल्वेची धडक बसल्याने एक गवा गंभीर जखमी झाला होता. काही वेळ तडफडत राहिल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणांनी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *