Categories Civic Issues

मिराबाग बंधाऱ्याविरोधातील आंदोलनाचा १२वा दिवस

सरकारकडून अद्याप दखल नाही;आंदोलक आक्रमक मिराबाग बंधाऱ्याविरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा १२वा दिवस असून अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. या काळात सरकारमधील एकाही राजकारण्याने किंवा जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही.सरकारच्या या भूमिकेमुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले असून आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करून तो तात्काळ स्थगित करावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *