१० वर्षे प्रलंबित तक्रारीवर कारवाईला गती; BCI ला १७ मे २०२६ पर्यंत मुदत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वकील श्रीकांत नायक यांच्याविरोधातील प्रलंबित तक्रारीवर महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी २०१५ मध्ये दाखल केलेल्या या प्रकरणात दीर्घ विलंब झाल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करत Bar Council of India ला १७ मे २०२६ पर्यंत अंतिम निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कथित मालमत्ता व्यवहारात ₹१.१५ कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप असून, तब्बल दहा वर्षे उलटूनही अंतिम आदेश न झाल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुढील सुनावणी १० जून २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.
Categories
Civic Issues
