Categories Political

“मी कमी बोलतो, जास्त काम करतो”: ऋतेश नाईकांचा विश्वास

ऋतेश नाईक यांचा दावा; संपर्क मोहिमेनंतर विजय निश्चित पोंडा मतदारसंघात भाजप उमेदवार ऋतेश नाईक यांनी विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या टीमने यशस्वीपणे घरोघरी संपर्क मोहीम पूर्ण केल्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे त्यांनी सांगितले. “मी कमी बोलतो, पण जास्त काम करतो,” असे म्हणत त्यांनी आपल्या कामकाजावर भर दिला. सामाजिक आणि राजकीय कार्यात आपण नवीन नसल्याचे नमूद करत, पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली विकासकामे जीसुडाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *