श्री महादेव भूमिका घवणलेश्वर महिला भजनी मंडळ कडून भजन सादर श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारनिमित्त मोरजी येथील श्री भूमिका मंदिरात भक्तिमय वातावरणात भजन सादर करण्यात आले. श्री महादेव भूमिका घवणलेश्वर महिला भजनी मंडळ, यांच्या सुमधुर गायनाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावाने भारावून गेला. या मंडळाने अखिल गोवा महिला भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल परब कुटुंबीयांकडून त्यांचा खास सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामस्थ आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Categories
Civic Issues

