राजकारण न करता भौगोलिक सोयीचा विचार करा – कुडचडे हे सर्व तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाण, युक्तिवाद शिवसेनेचे माजी दक्षिण गोवा जिल्हा प्रमुख धनराज यशवंत नाईक यांनी गोव्यातील तिसऱ्या जिल्ह्याच्या प्रस्तावित मुख्यालयावरून राजकारण न करता, मुख्यालय केवळ कुडचडे शहरातच स्थापन करावे अशी स्पष्ट मागणी केली आहे. कुडचडे हे काणकोण, सांगे, केपे व धारबांदोडा या तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, प्रशासकीय दृष्टीने सर्वांसाठी सोयीचे ठरेल, असा युक्तिवाद नाईक यांनी केला.
Categories
Civic Issues