मुख्यालय केवळ कुडचडेलाच योग्य – कुडचडेवासीयांची ठाम भूमिका गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा झाल्यानंतर केपे आणि कुडचडे या दोन मतदारसंघांमध्ये जिल्हा मुख्यालय आपल्या भागात यावे यासाठी चुरस सुरु झाली आहे. दरम्यान, कुडचडेवासीयांनी आपली भूमिका ठामपणे मांडत मुख्यालयासाठी केवळ कुडचडेच सर्वार्थाने योग्य ठिकाण असल्याचा दावा केला आहे. भौगोलिक सोय, प्रशासकीय इमारतींची उपलब्धता व दळणवळणाच्या दृष्टीने कुडचडे अधिक सक्षम असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
Categories
Civic Issues