निसर्गाच्या कुशीत फुललेली रानफुलांची उधळण पर्यटकांचे लक्ष वेधतेय तुये पठारावर सध्या हरण फुलांचा मनोहारी मळा फुलून आला असून, संपूर्ण परिसर फुलांच्या सौंदर्याने बहरला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात उगवलेली ही रानफुलं पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहेत. विविध रंगांची उधळण करणाऱ्या या फुलांनी पठाराची शोभा अधिकच वाढवली असून, स्थानिकांचेही या सौंदर्याबाबत कौतुक सुरू आहे.
Categories
Environment