प्रेम दिलं तर प्राणी-पक्षीही परिवार बनतात – मोराच्या नित्य भेटीने घरात आनंदाचं वातावरण भारतीय संस्कृतीत राष्ट्रीय पक्षी मानल्या जाणाऱ्या मोराचे माणसांशी असलेले नातं किती जवळचं आहे, याचे एक सुंदर उदाहरण कुडचडे येथील बाणसाय व्हील पॉईंट परिसरात पाहायला मिळाले. महेश नाईक यांच्या घरालगत दररोज भेट देणाऱ्या मोराने अलीकडेच आपले पिस फुलवून जेव्हा नृत्य केले, तेव्हा ते दृश्य पाहण्यासाठी अनेकांची नजर तिथे स्थिरावली.महेश नाईक म्हणतात, “प्रेम दिलं तर आपण प्राणी-पक्ष्यांनाही आपल्यासारखं जपू शकतो. हेही आपल्याच कुटुंबाचा भाग आहेत.” या प्रसंगातून माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याची नाजूक पण सशक्त वीण अधोरेखित होते.
Categories
Environment