‘ऑपरेशन सिंदूरं’ विषयावर साकारलेला देखावा भाविकांचे आकर्षण म्हापसा : घाटेश्वर नगर, खोर्ली, म्हापसा येथील कुडणेकर परिवाराने गणेशोत्सवानिमित्त ‘ऑपरेशन सिंदूरं’ या विषयावर देखावा उभारला आहे. सामाजिक संदेशासह भक्तिभाव आणि कलात्मकतेचे सुंदर मिश्रण असलेल्या या सजावटीने स्थानिक भाविकांसह पर्यटकांचेही लक्ष वेधले आहे. गणेशभक्तांसाठी हा देखावा विशेष आकर्षणाचा ठरत असून, गणेशोत्सवातील सृजनशीलतेचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
Categories
Art & Culture

