फुलांचा कचरा नदी व सार्वजनिक ठिकाणी टाकू नये यासाठी १७ कलशांची स्थापना म्हापसा शहरात स्वच्छ व हरित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘निर्माल्य कलश’ प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी १७ कलश ठेवण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात होणारा फुलांचा कचरा या कलशांत जमा होऊन तो नदी व सार्वजनिक ठिकाणी टाकण्यासापून रोखल जाणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Categories
Civic Issues