पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय व व्यापार क्षेत्राला दिलासा नवी दिल्ली येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या ५६व्या ऐतिहासिक बैठकीत दूरगामी निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली घेतलेल्या या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून, मध्यमवर्गीयांसह व्यापारसुलभतेलाही चालना मिळणार आहे असे मुख्यमंत्री डॉ सावंत म्हणाले केंद्रीय अर्थ व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली परिषदेत सर्वानुमते महत्त्वपूर्ण सुधारणा मंजूर करण्यात आल्या. या सुधारणा पारदर्शकता, ‘Ease of Doing Business’ आणि सर्वांसाठी समृद्धी साध्य करण्याच्या सरकारच्या दृढनिश्चयाचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले
Categories
Political