ED कडून शिवशंकर मयेकरला ९ दिवसांची कोठडी; दोषींवर पक्षभेद न ठेवता कारवाई झाली पाहिजे :लोबो आसगाव आणि हणजूणे कोम्युनिदाद जमीन बळकाव प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईचे शिवोली आमदार दिलायला लोबो यांनी स्वागत केले आहे. या प्रकरणात शिवशंकर मयेकरला ९ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून, आमदार लोबो यांनी हे प्रकरण अनेकवेळा विधानसभेत उपस्थित केले होते. आसगाव आणि हणजूणे कोम्युनिदाद तसेच SIT आणि ED ने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे आणि जो कोणी या प्रकरणात सामील असेल, तो भाजप मंत्री असो किंवा कार्यकर्ता, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे अस लोबो म्हणाल्या
Categories
Political

