Categories Civic Issues

आसगावमध्ये भीषण अपघात

स्कूटरस्वार गंभीर जखमी, कार चालकावर मद्यपान करून वाहन चालविल्याचा आरोप असगाव येथे शुक्रवारी सायंकाळी गंगा टाइल्स रस्त्याजवळ झालेल्या भीषण अपघातात स्कूटरस्वार गंभीर जखमी झाला आहे. मापसाहून असगावकडे जाणाऱ्या स्कूटरला विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारने स्कूटर जवळपास २० मीटरपर्यंत ओढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्घटनेत स्कूटर चालक गंभीर तर मागील आसनावरील प्रवासी किरकोळ जखमी झाला असून दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिकांनी आरोप केला की, कार चालक मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे वाहन चालवत होता आणि अपघातानंतरही तो थांबला नाही. दरम्यान, अंजुना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

About The Author

More From Author

1 comment

Нужен трафик и лиды? https://avigroup.pro/kazan/ SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *