धार्मिक उत्सवासाठी भाविकांत उत्साह; मंगळवारी कलश आगमन दिंडीने स्वागत श्री आप्टेश्वर सिद्धिविनायक देवस्थानात मूर्तीचा पुनःप्राणप्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार सोहळा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा होत आहे.मंगळवारी देवस्थानात कलशाचे आगमन झाले. भाविकांनी पारंपरिक दिंडी काढून कलशाचे जल्लोषात स्वागत केले. नव्याने साकारलेल्या मंदिराच्या वैभवदर्शनासाठी परिसरातील भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असून, धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विस्तृत तयारी देवस्थान समितीने पूर्ण केली आहे.
Categories
Civic Issues

