महाराष्ट्र व कर्नाटकातून टॅक्सी मागवण्याची शक्यता; सरकारने हस्तक्षेप करावा — मोगांबो ONGC इंडिया एनर्जी वीकच्या पार्श्वभूमीवर सर्व गोवा टॅक्सी मालकांनी दक्षिण गोव्यातील टॅक्सी ऑपरेटर्ससोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी मोगांबो यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून बाहेरील टॅक्सी सेवा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक गोवा टॅक्सी चालकांवर अन्याय होणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात गोवा सरकारने तातडीने हस्तक्षेप करून स्थानिक टॅक्सी ऑपरेटर्सना न्याय द्यावा आणि त्यांचे हित जपावे, अशी मागणी मोगांबो यांनी केली.
Categories
Civic Issues
ONGC इंडिया एनर्जी वीकमुळे गोवा टॅक्सीवर होणार अन्याय ?
