Politics Category

मच्छीमार खात्यानं केली ‘समुद्र पूजा’ उपमुख्यमंत्री डिसोझा यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण मच्छीमारांना दिल्या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा खात्याच्या ‘गोवन फिश ट्रेल्स’ पुस्तकाचं प्रकाशन पृथ्वीवरील जीवसृष्टीचं पोषण करणारा आणि मानवी जीवनाला गती देणारा देव म्हणजे समुद्रदेव… मच्छीमार बांधवांच्या पिढ्या याच समुद्रानं तरल्या… त्यांचं पालन पोषण केलं… त्यामुळं मच्छीमार बांधव श्रावणी पौर्णिमेला श्रीफळ अर्पण करून आपल्या समुद्रदेवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. शुक्रवारी मच्छिमार खात्यानं पणजी इथं श्रीफळ अर्पण करून समुद्राचे पूजा केली. यावेळी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, मत्स्योद्योगमंत्री आवेर्तिन फुर्तादो आदी मान्यवर आणि खात्याचे अधिकारी उपस्थित होते. “हा मासेमारी हंगाम चांगला जावो आणि मच्छीमारांनाRead More
कामगार संघटनांचा २ रोजी देशव्यापी बंद गोव्यातील औद्योगिक वसाहती राहणार बंद सातव्या वेतन आयोगाचा कामगार संघटनांकडून निषेध गोवा कामगार संघटनेची पणजीत बंदसाठी जागृती बड्या उद्योजकांच्या हातचं बाहुलं बनलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात सर्व कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये राज्यातील सर्व औद्योगिक, खाण, बंदर कामगार तसंच सरकारी बँक आणि विमा महामंडळाचे कर्मचारी भाग घेणार आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक वसाहती बंद राहणार आहेत. या बंदविषयी जागृती करण्यासाठी ‘गोवा कामगार संघटने’नं बुधवारी पणजीत जागृती मोहीम राबवली. यावेळी कामगार नेत्यांनी सातव्या वेतन आयोगाचा निषेध केला.Read More
राजभाषा बदलण्यास कॉंग्रेसचा विरोध मिटलेला वाद पुन्हा उकरून काढला जातोय राजभाषेवरून केले जाताहे राजकारण कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांचा आरोप राजभाषेचा मुद्दा उकरून काढून काहीजण समाजात दुफळी माजवत असून, हा प्रकार कॉंग्रेस पक्ष अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. गोव्याच्या जनतेनं कोकणी राजभाषा स्वीकारली असताना पुन्हा या विषयावरून वाद करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया फालेरो यांनी यावेळी व्यक्त केली.Read More

Posted On August 17, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

GOVT SCHOOL IN CHIRPUTE IN DISTRESS

चिरपुटे सरकारी शाळेच्या छप्पराची दुरवस्था भावी पिढी घेताहे मृत्युच्या जबड्यात शिक्षण जीएसआयडीसीचे सरकारी वास्तूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष स्थानिक पंचायत सदस्यांनी डागली तोफ सरकारी वास्तूंच्या देखभालीची जबाबदार बांधकाम खात्याकडून पायाभूत विकास महामंडळाकडे स्थलांतरित केल्यापासून सरकारी शाळा, आरोग्य केंद्रे आणि वसाहती धोकादायक बनत चालल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून एकाही सरकारी वास्तूची डागडूजी महामंडळानं केलेली नाही. याचा अनुभव सध्या चिरपुटे-बांदोडा इथल्या सरकारी शाळेचं व्यवस्थापन घेताहे. या शाळेचं छप्पर मोडकळीस आलं असून मृत्युच्या जबड्यात भावी पिढी शिक्षण घेताहे. चार वर्षांपासून शाळेच्या वास्तूची पाहणी करण्यासाठी महामंडळाचा एकही अधिकारी या शाळेकडे फिरकलेला नाही. या छप्पराची दुरुस्ती करण्यासाठीRead More
ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा घेतला आढावा ‘ब्रिक्स परिषद’ गोव्यासाठी मोठे आव्हान ‘ब्रिक्स परिषदे’साठी गोवा सरकारची जय्यत तयारी २ सप्टेंबरला पुन्हा घेणार तयारीच आढावा ‘ब्रिक्स परिषदे’मुळे गोव्याचा होणार जगभर नावलौकिक मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ‘ब्रिक्स परिषदे’साठी गोवा सरकारनं जय्यत तयारी केलीये. या तयारीचा नुकताच आढावा घेण्यात आला असून पुढील आढावा बैठक २ सप्टेंबरला होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यावेळी दिली.Read More
मोपाची अखेरची निविदा २६ रोजी उघडणार निविदा उघडल्यानंतर बांधकामाचा शिलान्यास होणार मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अखेरची निविदा शुक्रवार, दि. २६ रोजी उघडण्यात येणाराहे. या बाबतीत आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही. २६ जुलैपर्यंत वित्तीय निविदा खोलण्याची मुदत होती; परंतु दोन कंपन्यांनी विनंती केल्याने ती महिनाभराने वाढवण्यात आलीये. या निविदा उघडल्यानंतर शिलान्यास कार्यक्रमांचा मुहूर्त ठरवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.Read More

Posted On August 16, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

TOURIST SECURITY TO BE STRENGTHENED : CM

राज्य मंत्रीमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष दलाची स्थापना विविध पर्यटन स्थळांवर दलाचे कर्मचारी राहणार तैनात ‘पर्यटक सुरक्षा दला’त ५० कर्मचाऱ्यांची भरती गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारनं पर्यटक सुरक्षा दल स्थापन केला असून या दलामध्ये ५० पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या दलाचे कर्मचारी राज्यातील विविध पर्यटन स्थळांवर सदैव तैनात असतील, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती स्थिर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती उपसभापती विष्णू वाघ यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू प्रकृती बिघडल्याने ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार ह्रदयविकारतज्ञ डॉ. बोरकर यांनी दिली माहिती गोवा विधानसभेचे उपसभापती विष्णू वाघ यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू असून सध्या ४८ तास त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. ही माहिती वाघ यांच्यावर उपचार करणारे ह्रदयविकारतज्ञ डॉक्टर बोरकर यांनी पत्रकारांना दिली. सोमवारी अचानक त्यांचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना अस्वस्थता वाटू लागली होती. त्यामुळं तातडीनं त्यांना उपचारासाठी भरती करण्यातRead More

Posted On August 11, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

LAND SCAM IN THE NAME OF SEZ

‘एसईझेड’अंतर्गत कुठ्ठाळीत जमीन घोटाळा ३८ लाख चौरसमीटर जमीन कवडीमोल दरानं विकली चार वर्षांपूर्वी एसीबीनं दाखल केलाय एफआयआर एसीबीकडून ३० दिवसांत प्राथमिक अहवाल मागवणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे सभागृहाला आश्वासन विशेष आर्थिक विभाग स्थापण्याच्या नावाखाली कुठ्ठाळीतील ३८ लाख चौरसमीटर जमीन कवडीमोल दरानं उद्योजकांना विकली असून याप्रकरणी चार वर्षांपूर्वी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे एफआयआर दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी ३० दिवसांत एसीबीकडून प्राथमिक अहवाल मागवून पुढील कारवाई सुरू केली जाईल, असं आश्वासनं मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी सभागृहाला दिलं. आमदार माविन गुदिन्हो यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.Read More

Posted On August 11, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

JUDICIAL INQUIRY OF GOA SAHAKARI BANK : CM

गोवा सहकारी बँकेतील घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी होणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे सभागृहाला आश्वासन मौल्यवान मालमत्ता कवडीमोल किमतीत विकल्याचा आरोप सहकार निबंधक आणि बँक संचालकांची मिलीभगत असल्याचा आरोप गोवा राज्य सहकारी सोसायटी बँकेत मौल्यवान मालमत्तेचा कवडीमोल भावात लिलाव करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी सभागृहाला दिलं. सहकार निबंधक आणि सोसायटीचे अध्यक्ष यांनी संगनमतानं बँकेत घोटाळा केल्याचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई आणि आमदार दिगंबर कामत यांनी सभागृहासमोर मांडला होता. यावेळी सर्व विरोधकांबरोबरच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनीदेखील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.Read More
Close