नदीच्या पुरामुळे तासन्तास वाहतूक ठप्प; नव्या उंच पुलाच्या बांधणीची जोरदार मागणी सांगे तालुक्यातील वालशे पुल पुन्हा एकदा पावसाच्या तडाख्याने पाण्याखाली गेला आहे. पुलाची उंची कमी आणि दोन नद्यांचे जोडलेले प्रवाह, यामुळं कर्नाटकातून येणाऱ्या पुराच्या पाण्याचा भार थेट या पुलावर येतो. परिणामी, वाहनचालक व स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागते. अनेक वेळा आपत्कालीन सेवा देखील अडकून पडतात.“दर वर्षी हेच चित्र… पण उपाय काहीच नाही!” अशी प्रतिक्रया स्थानिक व्यक्त करत आहेत , यासाठी स्थानिकांकडून आता नव्या, उंच आणि सुरक्षित पुलाच्या तातडीच्या बांधणीची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस पावलं उचलली जात नाहीत, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.हा पूरप्रश्न केवळ वाहतुकीचा नाही, तर जनतेच्या जीविताचा प्रश्न बनत चालला आहे – आणि तो वेळेत सोडवला गेला नाही, तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
Categories
Environment

