Categories Civic Issues

आगरवाडा मुख्य रस्त्यावर वीज खांबांवर बेकायदेशीर जाहिरात फलकांचे अतिक्रमण!

सरकारकडे चौकशीची मागणी; वीज विभागालाही परवान्यांची माहिती उपलब्ध नाही मोरर्जी चोपडे आगरवाडा मुख्य रस्त्यावर *वीज खांबांवर मोठ्या प्रमाणात जाहिरात फलकांचे अतिक्रमण* सुरू असून, या फलकांना परवानगी कोणी दिली याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हे फलक *बेकायदेशीररीत्या लावण्यात आले आहेत का, याची **चौकशी स्थानिक पंचायत व सरकारने करावी*, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात *उपविभागीय वीज केंद्र, आगरवाडा* येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, *वीज खांबांवर जाहिरात फलक लावण्यासाठी परवाने मुख्य कार्यालयातून दिले जातात, मात्र **सदर परवान्यांची यादी स्थानिक कार्यालयाकडे अद्याप आलेली नाही*, त्यामुळे कोणाला परवाने देण्यात आले आहेत हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *