पर्यटन खाते व कार्निवल समितीच्या सहकार्यात आयोजन; आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत जल्लोष Morjim Carnival Committee, Goa Tourism Department आणि Jit Arolkar यांच्या सहकार्यातून आश्वे–मांद्रे येथे मोरजी कार्निवलचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. रंगतदार मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध देखाव्यांमुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.या सोहळ्यास आमदार जीत आरोलकर, जिल्हा पंचायत सदस्य तारा हडफडकर, मांद्रेचे सरपंच तथा समितीचे अध्यक्ष रॉबर्ट फर्नांडिस, इतर पंच व उपसरपंच तसेच हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्निवलच्या माध्यमातून पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
Categories
Entertainment
आश्वे–मांद्रे येथे मोरजी कार्निवलचा उत्साहात शुभारंभ
