Categories Civic Issues

एलपीजी पुरवठ्याबाबत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

गोव्यात घरगुती गॅसचा पुरवठा स्थिर; नागरिकांनी घाबरून सिलिंडर खरेदी करू नये – मुख्यमंत्री Pramod Sawant यांच्या अध्यक्षतेखाली एलपीजी आणि एलएनजी गॅस पुरवठ्याबाबत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव, नागरी पुरवठा विभागाचे सचिव तसेच Hindustan Petroleum Corporation Limited, Indian Oil Corporation Limited आणि Bharat Petroleum Corporation Limited चे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व गोमंतकियांना आश्वस्त करत सांगितले की, Ministry of Petroleum and Natural Gas च्या निर्देशानुसार घरगुती स्वयंपाक गॅसचा पुरवठा राज्यात स्थिर आणि पुरेसा आहे. प्रत्येक नोंदणीकृत ग्राहकाला बुकिंग केल्यानंतर ठरलेल्या कालावधीत सिलिंडर मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नागरिकांनी संयम बाळगावा आणि गॅस एजन्सीसमोर रांगा लावून घाबरून सिलिंडर खरेदी करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. केंद्र सरकार आणि गोवा सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून प्रत्येक घरापर्यंत गॅसचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *