म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकच्या अधिकार्यांचा सहभाग; पुढील बैठक महाराष्ट्रात कर्नाटक सरकार कळसा-भंडुरा धरण प्रकल्प उभारून म्हादईचे पाणी वळवू इच्छित असल्याच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील म्हादई सभागृह समितीच्या २४ ऑक्टोबरच्या बैठकीत कळसा-भंडुरा धरणांचे संयुक्त सर्वेक्षण सुप्रीम कोर्टाकडे मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाचे परीक्षण करावे, अशी मागणी यावेळी निश्चित करण्यात आली. म्हादई सभागृह समितीचे अध्यक्ष आणि गोव्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याच्या निमंत्रणानुसार पुढील प्रीवॉ कमिटी बैठक महाराष्ट्रात होणार आहे.
Categories
Political

