१९९९ च्या कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या शौर्य आणि बलिदानाचा स्मरणीय दिवस कारगिल विजय दिनाच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात भारतीय जवानांच्या शौर्याला व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धात विजय मिळवत पाकिस्तानच्या घुसखोरीला पराभूत केले. हा दिवस दरवर्षी आपल्या सैन्यदलाच्या साहसाची, निस्वार्थी सेवा आणि मातृभूमीसाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. यानिमित्ताने विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम, वीरांना सलामी, व देशभक्तिपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Categories
Uncategorized