सुमारे २.७५ लाख रुपयांचे बिल बाकी; आतापर्यंत ४०० कनेक्शन तोडल्याची माहिती कुडचडेत सुलभ शौचालयाचे पाणी कनेक्शन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने तोडले आहे. जवळपास पावणे तीन लाख रुपयांचे पाणी बिल न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. विभागाचे सहायक अभियंता हरीष काकोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडचडे परिसरात आतापर्यंत एकूण ४०० पाणी कनेक्शन थकबाकीमुळे तोडण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचे हाल वाढले असून थकबाकीदारांकडून वसुलीची मोहीम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Categories
Civic Issues