वीज शॉक लागून कामगार गंभीर जखमी; वेळेत वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला कुडचडे येथे सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामादरम्यान भीषण दुर्घटना घडली. काम करत असताना अचानक वीज शॉक लागल्याने एक कामगार गंभीर जखमी झाला. या घटनेदरम्यान वेल्डिंग कामासाठी वापरण्यात आलेल्या दोन पाच किलो वजनाच्या सिलिंडरचा स्फोट झाला. घटनेनंतर इतर कामगारांनी आरडा-ओरडा करून तत्काळ वीज प्रवाह खंडित केल्याने इतर कामगारांचा जीव वाचला. वेळेत वीजपुरवठा बंद न केला असता मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. घटनेनंतर कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Categories
Civic Issues
कुडचडे येथे रेल्वे पुलाच्या कामादरम्यान भीषण दुर्घटना