साचलेले पाणी आणि घसरडी चिखलमिश्रित जमीन वाहनचालकांसाठी धोकादायक गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या *अतिवृष्टीमुळे गुले ते काणकोण दरम्यानचा रस्त्यालगतचा पार्किंग परिसर जलमय झाला असून, तो अक्षरशः “जलतरण तलाव” बनला आहे.* या ठिकाणी साचलेले पाणी आणि घसरडी चिखलयुक्त जमीन यामुळे *वाहनचालकांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.* त्यामुळे स्थानिक नागरिकांनी *प्रशासनाने तातडीने दुरुस्ती आणि जलनिचरा व्यवस्था करण्याची मागणी* केली आहे.
Categories
Civic Issues
गुळे ते काणकोण रस्त्यावरील पार्किंग परिसर पावसामुळे झाला जलतरण तलाव!

