सुरू असलेल्या बांधकामामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप थिवी परिसरातील सुरू असलेल्या World Peace University प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी समाजातील नागरिकांनी शांततापूर्ण आंदोलन छेडले. डोंगर कापणी आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी जमीन भाडेपट्टा प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी केली. परिसरातील पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करत स्थानिकांनी तातडीने योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन प्रशासनाला केले.
Categories
Civic Issues
थिवीत वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचे शांततापूर्ण आंदोलन
