Categories Civic Issues

मांद्रे पोलीस स्टेशनमध्ये सार्वजनिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन

विठ्ठल-रखुमाईच्या देखाव्याने स्टेशन परिसर भक्तिमय; पोलीस निरीक्षक गितेंद्र नाईक यांच्या यजमानपदाखाली पूजन मांद्रे पोलीस स्टेशनमध्ये सार्वजनिक सत्यनारायण महापूजेचे भक्तिभावाने आयोजन करण्यात आले. या निमित्ताने पोलीस स्टेशनमध्ये विठ्ठल-रखुमाईचा सुंदर देखावा साकारण्यात आला होता. पोलीस निरीक्षक गितेंद्र नाईक यांच्या यजमानपदाखाली महापूजा संपन्न झाली. या प्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. तसेच, स्टेशन परिसरात जनजागृतीसाठी विविध संदेश फलकही लावण्यात आले, ज्यामुळे भक्ती आणि सामाजिक जागृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

About The Author

More From Author

1 comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *