ब्रागांझा अपार्टमेंटजवळ सापडला मृतदेह म्हापसा येथील कदंब बसस्थानकासमोर ब्रागांझा अपार्टमेंटजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिस स्थानकातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली असून १०८ रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह म्हापसा जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी हलविण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Categories
Civic Issues

