बस, टॅक्सी, ट्रक, टँकर, मोटारसायकल पायलट आदी सर्व घटकांचा सहभाग; राज्यभरातून उपस्थिती राज्यातील सर्व परिवहन घटकांनी बुधवारी म्हापसा येथील Shri Dev Bodgeshwar मंदिर सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला बस मालक, टॅक्सी चालक व मालक, जेसीबी व ट्रक मालक, टँकर चालक, मोटारसायकल पायलट, ऑटोरिक्षा चालक तसेच रेंट-अ-बाईक व रेंट-अ-कार व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून, विद्यमान परिवहन संचालकांना पदावरून हटविण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. राज्यभरातील परिवहन व्यावसायिकांनी एकत्र येत आपल्या मागण्यांसाठी पुढील आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Categories
Civic Issues

