Categories Civic Issues

विद्यार्थी पंचायत यात्रा २०२५–२६ अंतर्गत फोंडा येथे विद्यार्थी संवाद

एनएसयूआय-युवा फॉरवर्ड नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा “विद्यार्थी बोलले तर सत्ताही ऐकते” या घोषवाक्याखाली विद्यार्थी पंचायत यात्रा २०२५–२६ उपक्रमांतर्गत फोंडा येथे जीव्हीएम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स तसेच पीईएस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. NSUI-युवा फॉरवर्ड नेतृत्वाखालील Goa University Students Council ने हा कार्यक्रम राबविला.पिण्याच्या पाण्याची सुविधा,, ग्रंथालयाची स्थिती, पुरवणी परीक्षांचे शुल्क, प्रकल्प मार्गदर्शनातील स्पष्टता तसेच विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता अशा विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून ते संबंधित प्राधिकरणांकडे औपचारिकरित्या मांडण्यात आले.राज्यभरातील गोवा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये मार्च अखेरपर्यंत ही यात्रा सुरू राहणार असून, विद्यार्थी प्रश्न केवळ चर्चेत न राहता त्यावर जबाबदारीने आणि कृतीतून उपाययोजना व्हाव्यात, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *