महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा टाळल्याचा आरोप; अर्थसंकल्प मंजुरी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी राज्य सरकारवर आरोप करत विधानसभा अधिवेशन बेकायदेशीरपणे कमी केल्याचा दावा केला आहे. यामुळे गोव्याच्या जनतेला महत्त्वाच्या मुद्द्यांवर, विशेषतः कलम 39A संदर्भातील चर्चेपासून वंचित ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. निवडणूक आचारसंहितेचा दाखला देत अधिवेशन कमी करण्यात आले, मात्र महाराष्ट्रात पोटनिवडणुका सुरू असतानाही अधिवेशन सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच अशा पद्धतीने अर्थसंकल्प मंजूर करणे ही बेकायदेशीर प्रक्रिया असल्याचा आरोप त्यांनी केला.
Categories
Political
विधानसभा अधिवेशन बेकायदेशीरपणे कमी केले – सुनील कवठणकर