Categories Civic Issues

साळगाव येथे अपघात; स्कूटरस्वार गंभीर जखमी

चालक मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप साळगाव पंचायत कार्यालयासमोर घडलेल्या अपघातात चारचाकी वाहनाने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने स्कूटरस्वार गंभीर जखमी झाला. धडकेनंतर चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन पार्क केलेल्या कारनाही धडक दिल्याने त्यांचे नुकसान झाले. जखमीला तत्काळ मापसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *