Categories Civic Issues

कुडचडे येथे रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त विशेष बैठक

वाहतूक नियंत्रणासाठी स्वयंसेवकांना मार्गदर्शन जानेवारी महिना पूर्णतः *रोड सेफ्टी महिना* म्हणून साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कुडचडे वाहतूक पोलिस निरीक्षक महेश वेळीप यांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांची खास बैठक घेतली. या बैठकीत वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण कसे ठेवावे, अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी तसेच गर्दीच्या ठिकाणी शिस्त कशी राखावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. रस्ता सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून पोलिस व स्वयंसेवकांच्या समन्वयातूनच सुरक्षित वाहतूक शक्य आहे, असे यावेळी निरीक्षक वेळीप यांनी स्पष्ट केले.

About The Author

More From Author

20 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *