खोदकामानंतर रस्ता दुरुस्त न केल्याने ३५ टनांचा ट्रक रस्त्याच्या कडेला रूतला साळगाव शासकीय शाळेजवळ ३५ टन वजनाचा सिमेंट मिक्सर ट्रक रस्त्या कडेला रुतल्याने वाहतूक कोंडी झाली , भूमिगत केबल आणि पाईपलाइन टाकणीसाठी खोदलेला रस्ता पूर्ववत न केल्याने ट्रकच्या वजनामुळे खचला. वीज विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून रस्त्याचे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलीस व पंचायतीशी सातत्याने समन्वय साधला जाईल आस साळगावचे आमदार केदार नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
Categories
Environment