Categories Civic Issues

सावर्डे मतदारसंघातील कष्टीमळ येथे कचरा ढिगाऱ्याला पुन्हा आग

BNF प्लांटजवळ दुर्गंधी; गेल्या वर्षीच्या घटनेची आठवण, गावात खळबळ सावर्डे मतदारसंघातील कष्टीमळ परिसरात, BNF प्लांटच्या जवळ असलेल्या कचरा ढिगाऱ्याला पुन्हा एकदा आग लागल्याने संपूर्ण गावात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच ठिकाणी असलेल्या चिरेखाणीत कचऱ्याला आग लावण्यात आली होती आणि ती आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला तब्बल चार दिवस लागले होते. आता पुन्हा तोच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, वारंवार घडणाऱ्या घटनांमागील कारणांचा शोध घेऊन जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

About The Author

More From Author

36 comments

Leave a Reply to graph.org Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *