तासभर लिफ्टमध्ये अडकलेले आजोबा सुखरूप बाहेर; शेजाऱ्याच्या जागरूकतेमुळे टळली दुर्घटना पर्वरी अग्निशमन केंद्राच्या पथकाने ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवत आपली तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली. संबंधित आजोबा तब्बल एक तास लिफ्टमध्ये अडकून पडले होते. शेजाऱ्याने वेळ न दवडता अग्निशमन दलाला संपर्क साधल्याने अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सुरक्षितपणे त्या नागरिकाची सुटका केली.स्थानिक नागरिकांनी या प्रसंगी अग्निशमन दलाचे कौतुक करत आभार मानले, तर या प्रसंगातून समाजातील एकोप्याची व सजगतेची जाणीव अधोरेखित झाली.
Categories
Environment