Categories Environment

निसर्गविनाश रोखण्यासाठी कडक कारवाईची मागणी

हणजूणे येथील पेकेन पेड्डे परिसरात सुरू असलेल्या एका शेती प्रकल्पात बेकायदेशीर डोंगर कापणी, जमीन भराव आणि अनधिकृत बांधकामाचे प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असतानाही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांनी संबंधित यंत्रणांकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. या बेकायदेशीर कृतींमुळे परिसराच्या निसर्गसंपत्तीचा ऱ्हास होत असून, भविष्यातील संभाव्य भूस्खलन व पूरस्थितीची भीती व्यक्त केली जात आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *