‘आप’ जनतेसोबत खंबीरपणे उभी; छुपे समर्थन कोणाला आहे हे जनतेला ठाऊक असल्याचा टोला. आम आदमी पार्टीचे नेते अमित पालेकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘आप’ ही जनतेचे प्रश्न घेऊन काम करत असून आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याची जनता आमच्या सोबत असून, कोणाचा कोणाला छुपा पाठिंबा आहे हे लोकांना चांगलेच माहित आहे, अशी टीका त्यांनी अमित पाटकर यांच्यावर केली.
Categories
Political
“आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही!” – अमित पालेकर यांचा काँग्रेसवर पलटवार

