ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन; पादचारी व वाहनचालकांच्या जीवाला धोका मडगाव शहरात पालिकेच्या कचरा गाडीच्या चालकाचा गंभीर बेजबाबदारपणा समोर आला आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर वाहन चालवताना संबंधित चालकाकडून ट्रॅफिक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असून, लवकर पुढे जाण्याच्या नादात धोकादायक आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याचे चित्र दिसून येत आहे. नियमांना धाब्यावर बसवून केल्या जाणाऱ्या या रॅश ड्रायव्हिंगमुळे पादचारी तसेच इतर वाहनधारकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराची दखल घेत प्रशासनाने अशा बेजबाबदार चालकांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Categories
Civic Issues
मडगावात पालिकेच्या कचरा गाडीचा रॅश ड्रायव्हिंगचा प्रकार उघड

