मोदी सरकारची स्वच्छ प्रतिमा हीच यूएसपी; गोव्याच्या ‘पुण्यभूमी’ परंपरेचा उल्लेख भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या स्वच्छ कारभारावर भर देताना सांगितले की, केंद्रातील कोणत्याही मंत्र्यांविरोधात आजपर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप कोणीही सिद्ध करू शकलेला नाही. “मोदीजी हेच सरकारचे यूएसपी आहेत,” असे स्पष्ट करत त्यांनी सरकारच्या पारदर्शकतेचा उल्लेख केला.यावेळी दामू नाईक यांनी गोव्याला ‘पुण्यभूमी’ म्हणून संबोधत, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर करण्यासारख्या ऐतिहासिक घोषणा गोव्यात झाल्याची आठवण करून दिली. गोव्याचा हा गौरवशाली वारसा देशाच्या राजकारणात कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.
Categories
Political
केंद्रीय मंत्र्यांविरोधात एकही घोटाळ्याचा आरोप नाही : दामू नाईक