विद्याप्रसारक हायस्कूलतर्फे वेशभूषेसह उत्सव; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीचे अनावरण Vidyaprasarak High School, मोरजी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत भव्य शोभायात्रा काढली. ही शोभायात्रा शाळेपासून सुरू होऊन मार्केट कॉम्प्लेक्स, बँक ऑफ बडोदा मार्गे पुन्हा शाळेत परतली.यानंतर शाळेच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीचे अनावरण करण्यात आले तसेच महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवात पाहायला मिळाला.
Categories
Civic Issues
मोरजी येथे शिवजयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा
