पावसाळ्यातील पूरस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्येवर उपाय; वास्कोतील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी कटिबद्धता वास्को मतदारसंघाचे आमदार Krishna Salkar यांच्या हस्ते खारेवाडा येथे प्रमुख स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळ्यात वारंवार उद्भवणारी पूरस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे.या प्रकल्पामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होऊन पाणी साचण्याची समस्या कमी होणार असून परिसरातील मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. वास्कोतील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उन्नतीस आपण कटिबद्ध असल्याचे सालकर यांनी यावेळी सांगितले.
Categories
Civic Issues
खारेवाडा येथे स्टॉर्म वॉटर ड्रेन पुनर्बांधणीचे काम आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते शुभारंभ
