Categories Civic Issues

मोरजी-तेमवाडा किनाऱ्यावरून ९३ कासव पिल्लांची समुद्रात यशस्वी मुक्तता

१९९७ पासून सुरू असलेल्या कासव संवर्धन मोहिमेला यंदाही चांगला प्रतिसाद; ३६ कासवांकडून ४२६० हून अधिक अंडी मोरजी तेमवाडा समुद्रकिनारी भागात १९९७ सालापासून सागरी कासव संवर्धन मोहीम सातत्याने राबवली जात आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या सागरी कासवाने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंडी घातली होती. त्या अंड्यांमधून उबवलेल्या ९३ पिल्लांना १९ तारखेला रात्री वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे समुद्रात सोडले.या हंगामात आतापर्यंत एकूण ३६ सागरी कासवांनी ४२६० पेक्षा जास्त अंडी घातल्याची माहिती वन विभागाने दिली असून, कासव संवर्धनाच्या दृष्टीने हा हंगाम समाधानकारक मानला जात आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *