साधू-संतांच्या उपस्थितीत सुमारे ८ हजार शिवप्रेमींच्या साक्षीने लोकार्पण सोहळा संपन्न सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा साधू-संतांच्या उपस्थितीत आणि गोव्याचे मुख्यमंत्री Pramod Sawant यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे ८ हजार शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात कार्यक्रमाला धार्मिक व सांस्कृतिक रंग चढला.
Categories
Civic Issues
सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते अनावरण
