शनिवार बाजार शेडमध्ये बुकिंग सुविधा सुरू करण्याची सरपंच जोसेफ सिक्वेरा यांची सूचना कळंगुट येथील नायका वाडो परिसरात एलपीजी बुकिंगसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांच्या पार्श्वभूमीवर कळंगुट ग्रामपंचायतीने एचपी गॅस एजन्सीला पत्र पाठवले आहे. सरपंच जोसेफ आर. सिक्वेरा यांनी नागरिकांच्या सोयीसाठी एलपीजी बुकिंगची प्रक्रिया कळंगुट शनिवार बाजाराच्या शेडमध्ये हलवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या ठिकाणी पंचायतीतर्फे खुर्च्या, इंटरनेट सुविधा तसेच पोलिस संरक्षण उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
Categories
Political
एलपीजी बुकिंगसाठी लागणाऱ्या लांब रांगांवर उपाय; कळंगुट पंचायतीचा एचपी गॅस एजन्सीला प्रस्ताव