महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतीक्षा खलप यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने; भाजप महिला नेत्यांच्या शांततेवरही सवाल एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ गोवा महिला काँग्रेसने पणजी बाजारात आंदोलन केले. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी घरगुती गॅस दरवाढीमुळे सामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण येत असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसेच या दरवाढीबाबत भाजपच्या महिला नेत्यांनी मौन का बाळगले आहे, असा सवालही महिला काँग्रेसने उपस्थित केला.
Categories
Civic Issues
एलपीजी दरवाढीविरोधात गोवा महिला काँग्रेसचे पणजी बाजारात आंदोलन