Categories Civic Issues

“स्वच्छ शहर” दर्जावर प्रश्न; पणजीत स्क्रॅप वाहनांचा पसारा

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी नाही पुरस्कारप्राप्त राजधानी पणजीत स्वच्छतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी टाकून दिलेली आणि स्क्रॅप वाहने अजूनही उभी असल्याचे चित्र दिसत आहे. पणजी पोलीस स्थानकासमोर उभी असलेली स्क्रॅप गाडी सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ८ दिवसांपेक्षा जास्त काळ उभी असलेली वाहने हटवण्याचे निर्देश दिले असले, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक जागांसाठी तातडीने कारवाईची मागणी होत आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *