“ECI भाजपची बाहुली”; पराभव टाळण्यासाठी निवडणूक रद्द केल्याचा आरोप फोंडा पोटनिवडणूक रद्दीकरणाच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हा दिवस गोव्याच्या राजकारणातील ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांचा विजय निश्चित दिसत असल्याने भाजपने निवडणूक रद्द करण्याचा मार्ग अवलंबला, असा गंभीर आरोप पाटकर यांनी केला. अॅडव्होकेट जनरलने न्यायालयात सरकारला निवडणूक नको असल्याचे सांगितल्याबद्दलही त्यांनी सवाल उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाला ‘षडयंत्र’ असल्याचे संबोधले.
Categories
Political
फोंडा पोटनिवडणूक रद्दीकरण ‘काळा दिवस’; अमित पाटकर यांचा सरकारवर हल्लाबोल

